॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

सद्गुरु श्रीमहीपती गुंडामहाराज

8.jpg
जन्म : शके १८०२, समाधीः चैत्र शुक्ल ७ शके १८५६
श्रीनारायणमहाराज यांचे कनिष्ठ बंधू. अत्यंत उदार, धर्मनिष्ठ, गुणज्ञ, लोकसंग्रही संत. महीपतीमहाराजांची पंढरीत पारमार्थिक समाजात सत्कीर्ती होती. अत्यंत तेजस्वी अशी महाराजांची गौरमूर्ती, विठ्ठलमंदिरात चक्रीभजनात तासन्‌तास रंगलेली अनेक भाविकांनी पाहिलेली. श्रीगुंडामहाराजांच्या बोधपरंपरेच्या विस्तारात महाराजांची भूमिका अत्यंत लक्षणीय होती.
सद्गुरु गुंडामहाराजांची चक्रीभजनपरंपरा त्यांनी मद्रासप्रांतापर्यंत नेली. विष्णुयागासारख्या यज्ञाची अनुष्ठाने ते सतत करीत व करवत. त्यांनी पंढरपुरात एक विशाल भागवतसप्ताहाचे आयोजन केले होते. तेव्हां पंढरपूरकरांनी त्यांचा भव्य नागरीसत्कार करून त्यांना सन्मानपत्र दिले होते. अनेक विद्वानांचा व साधुसज्जनांचा त्यांच्याशी घरोबा होता. चैत्रशुक्ल ७ शके १८५६ ला देगलूरला ते समाधिस्थ झाले. उद्दालिकातीरावर त्यांची समाधी आहे.