सद्गुरू चंद्रशेखरमहाराज देगलूरकर
श्रीमदाद्यशंकराचार्य विरचित श्रीपांडुरंगाष्टक स्तोत्राचे विठ्ठलोपासकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. परमात्मा पांडुरंगाच्या व्यापक ब्रह्मरूपतेचे व मंगलमय ब्रह्मांडपावक लीलांचे दर्शन आचार्यांनी या स्तोत्रात घडविले आहे. सर्वच संत-भक्त-महात्मे जगत्कल्याणार्थ परमात्म्याच्या परममंगल गुणगणांचे गान करीत असतात. याच भक्तस्वभावास अनुसरून आचार्यांनी अल्पाक्षरात अत्यंत तात्त्विकपध्दतीने श्रीपांडुरंगाच्या स्वरूपाची अनुपम महत्ता या स्तोत्रात अभिव्यक्त केली आहे. अशा या दिव्य स्तोत्राचे युक्तिपूर्ण, तर्कसम्मत व शास्त्रीय असे विवरण प्रस्तुत ग्रंथात श्री ह.भ.प.चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांनी केले आहे.