॥ सद्गुरू श्रीगुंडामहाराज देगलूरकर संस्थान, देगलूर आणि पंढरपूर. ॥ 

सद्गुरु श्रीगुंडा हरिमहाराज (गुंडामहाराज दुसरे)

6.jpg
जन्म : शके १७५९, समाधीः फाल्गुन कृष्ण १४ शके १८२४
सद्गुरु श्रीहरिमहाराजांचे सुपुत्र श्रीगुंडामहाराज दुसरे. महाराज अत्यंत साधुवृत्तीचे. भजनानंदात निमग्न असत. बालवृत्तीचे साधुपुरुष. महाराज एकटेच बसून चक्रीभजन करीत. पण वीणा, चिपळ्या, झांज, दिमडी व चाळ या सर्व वाद्यांचे वादन स्वतः एकटेच करीत असत. असे अलौकिक भजनसम्राट श्रीगुंडामहाराज दुसरे हे साक्षात्कारी संत होते. 
मूळपुरुष सद्‌गुरु श्रीगुंडामहाराजांच्या अभंगांची संहिता सुवाच्य हस्ताक्षरात महाराजांनी लिहून ठेवली आहे. संस्थानचा हा फार मोठा ठेवा आहे. महाराजांच्या वाचासिध्दीचे अनेकांना अनुभव येत. त्यांची वृत्ती हस्तामलकांसारखी विदेही होती.
फाल्गुन कृ.१४ शालिवाहन शके १८२४ ला चक्रीभजन म्हणून व सद्गुरु गुंडामहारांचे काही अभंग गात ते सद्गुरु चरणी विलीन झाले. देगलूरला उद्दालिकातीरावर त्यांची समाधी आहे.